⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

Rain Alert : राज्यात पुढील पाच दिवस पाऊस 

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२२ । कोकण, मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ, मराठवाड्यात पावसाने काही जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या. आता पुढील 5 दिवस राज्यातील कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई, नाशिक, ठाणे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागांत 9 ऑगस्टपर्यंत हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. तर मराठवाड्यातही मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. 

सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धो-धो- पाऊस बरसत आहे. जूनमध्ये ओढ दिलेल्या पावसाने जुलैमध्ये पावसाने जोर पकडला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळतेय. दरम्यानआता पुढील 5 दिवस राज्यातील कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई, नाशिक, ठाणे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागांत 9 ऑगस्टपर्यंत हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. तर मराठवाड्यातही मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. 

पुढली 5 दिवस राज्यात मान्सून सक्रिय राहणार 
पुढील 5 दिवस राज्यात मान्सून सक्रिय राहणार असून त्यातही हळूहळू वाढ होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.