आता प्रवाशांना ट्रेनमध्ये टेन्शनशिवाय झोपता येणार, रेल्वेच्या ‘या’ विशेष सेवेमुळे स्टेशनही चुकणार नाही

जून 3, 2022 2:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२२ । तुम्ही जर अनेक वेळा रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण रेल्वेने प्रवाशांसाठी मोठी सेवा सुरू केली आहे. त्यामुळे आता तुम्ही ट्रेनमध्ये स्टेशन चुकण्याची चिंता न करता आरामात झोपू शकता. रेल्वे तुम्हाला स्टेशनवर येण्याच्या २० मिनिटे आधी उठवेल. रेल्वेच्या या खास सुविधेबद्दल जाणून घेऊया..

Destination Alert Wakeup Alarm service

झोपेत स्टेशन सुटणार नाही
रेल्वेच्या या विशेष सेवेचे नाव ‘डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म’ असे आहे. अनेक वेळा ट्रेनमध्ये लोकांना झोप येते आणि बऱ्याचवेळी त्यांचे स्टेशन देखील चुकते. या समस्येवर मात करण्यासाठीच ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. हे सहसा रात्रीच्या वेळीच होते. रेल्वेने १३९ क्रमांकाच्या चौकशी सेवेवर ही सुविधा सुरू केली आहे. ट्रेनमध्ये प्रवास करणारे प्रवासी 139 क्रमांकाच्या चौकशी प्रणालीवर अलर्टची सुविधा मागू शकतात.

या वेळेत उपलब्ध असेल सुविधा
ट्रेनमधील कोणताही प्रवासी या सेवेचा लाभ घेऊ शकतो. रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेत प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध असेल. त्यासाठी रेल्वेकडून केवळ तीन रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तुम्ही ही सेवा घेतल्यास, तुमच्या स्टेशनच्या २० मिनिटे आधी तुमच्या फोनवर अलर्ट पाठवला जाईल. जेणेकरून तुम्ही तुमचे सामान वगैरे व्यवस्थित ठेवा आणि स्टेशनवर आल्यावर ट्रेनमधून उतरा.

तुम्ही अशा प्रकारे सेवा सुरू करू शकता
‘डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म’ सेवा सुरू करण्यासाठी प्रवाशांना IRCTC हेल्पलाइन 139 वर कॉल करावा लागेल.

कॉल आल्यावर तुम्हाला तुमची भाषा निवडावी लागेल.
डेस्टिनेशन अलर्टसाठी आधी ७ नंबर आणि नंतर २ नंबर दाबावे लागतील.
त्यानंतर प्रवाशांकडून 10 अंकी पीएनआर क्रमांक विचारला जाईल.
पीएनआर प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला पुष्टी करण्यासाठी 1 डायल करावा लागेल.
या प्रक्रियेनंतर, सिस्टम PNR नंबरची पडताळणी करेल आणि वेकअप अलर्ट फीड करेल.
त्याचा पुष्टीकरण एसएमएस प्रवाशाच्या मोबाईलवर प्राप्त होईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now