जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । जर तुम्हाला रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेने ९०४ पदांसाठी अप्रेंटिसची भरती जाहीर केली आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. Railway Apprentice Bharti 2025

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी रेल्वे रिक्रुटमेंट सेल हुबलीच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजे rrchubli.in जाऊन अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑगस्ट २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यापूर्वी अर्ज करावा. या नोकरीसाठीचा ट्रेनिंगचा कालावधी १ वर्षांसाठी असणार आहे. Railway Apprentice Recruitment 2025

विभागीय रिक्त पदांची माहिती
हुबळी विभाग – १२५ पदे
कॅरेज रिपेअर वर्कशॉप हुबळी – ११२ पदे
बेंगळुरू विभाग – ११२ पदे
म्हैसूर विभाग – ९१ पदे
मध्यवर्ती कार्यशाळा म्हैसूर – २३ पदे
या पदांसाठी होणार भरती
फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर मेकॅनिक, प्रोग्राम अँड सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट, मशीनिस्ट, टर्नर, कारपेंटर, पेंटर या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
भरतीसाठी पात्रता काय?
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शाळेतून १०वी आणि १२वीची परीक्षा पास केलेली असावी. याचसोबत संबंधित क्षेत्रात सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. या नोकरीसाठी १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सूट देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क : सामान्य आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि सर्व महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. ही अर्ज फी फक्त डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन पद्धतीने जमा करावी.
अर्ज कसा करावा?
स्टेप १: आरआरसी हुबलीच्या अधिकृत वेबसाइट rrchubli.in ला भेट द्या.
स्टेप २: होमपेजवर उपलब्ध असलेल्या ‘नोंदणी’ लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३: जर तुम्ही नवीन वापरकर्ता असाल, तर आवश्यक तपशील देऊन स्वतःची नोंदणी करा.
स्टेप ४: लॉग इन केल्यानंतर, वैयक्तिक, शैक्षणिक आणि इतर तपशीलांसह अर्ज फॉर्म भरा.
स्टेप ५: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज शुल्क भरा.
स्टेप ६: फॉर्म सबमिट करण्यापूर्वी सर्व तपशील काळजीपूर्वक तपासा.











