---Advertisement---
राष्ट्रीय

VIDEO : यूपीमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; एक्स्प्रेसचे 10 डबे रुळावरून घसरले, अनेक जण..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२४ । देशात सर्वात सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. मात्र रेल्वे अपघाताच्या घटना घडताना दिसत आहे. याच दरम्यान, आता उत्तर प्रदेशातील गोंडा येथे आज गुरुवारी दुपारी रेल्वेला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. येथे चंदीगडहून गोरखपूरमार्गे आसामला जाणाऱ्या दिब्रुगड एक्स्प्रेसचे 10 डबे रुळावरून घसरले. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे.

up train accident jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार चंडीगड येथून दिब्रुगडला जाणारी ट्रेन क्रमांक १५९०४ दिब्रुगड एक्स्प्रेस ही आज दुपारी २ च्या सुमारास गोंडा जंक्शन येथून पुढच्या प्रवासाला निघाली होती. मात्र काही वेळातच दुपारी २.३० च्या सुमारास गोंडापासून २० किमी अंतरावर या ट्रेनला अपघात झाला. या अपघातात ट्रेनचे दोन डबे रुळावरून पूर्णपणे घसरले. तर इतर काही डबेही अपघातग्रस्त झाले. अपघातग्रस्त डब्यांमधून प्रवाशी जीव मुठीत धरून बाहेर पडले.

---Advertisement---

या गाड्यांवर परिणाम
दरम्यान, या अपघाताबाबत रेल्वेने हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत. तसेच अपघातामुळे या मार्गावरून जाणाऱ्या 11 गाड्या वळवण्यात आल्या असून दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात भुसावळमार्गे धावणाऱ्या 22537 क्रमांकाची गाड्याच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

दरम्यान, रेल्वे अधिकाऱ्यांसोबत पोलीस प्रशासनानेही अपघातस्थळी धाव घेतली आहे. वैद्यकीय पथकालाही पाचारण करण्यात आलं आहे. तसेच डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ यांनीही या अपघाताची दखल घेतली असून, अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---