बनावट दारू कारखान्यावर छापा; संशयिता विरोधात गुन्हा
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२२ । शहरातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने, गुप्त माहितीवरून कारवाई करत कुऱ्हा येथे बनावट दारू कारखान्यावर छापा टाकला. मंगळवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास केलेल्या कारवाई बनावट मद्यासह ३६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.असून, संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
कुऱ्हा येथे अमोल वानखेडे याच्या घराच्या गच्चीवर बनावट दारूचा कारखाना सुरू असल्याचे आढळून आले. संशयित वानखेडे याने दिलेल्या माहितीनुसार त्याचा साथीदार अमोल वसंत भोई (रा. कुऱ्हा) हा देखील यात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे. छापा टाकल्यानंतर ३७ हजाराच्या मुद्देमालासह संशयित वानखेडेला अटक केली. तर या प्रकरणातील अन्य दोन संशयित पसार आहेत. मंगळवारी पहाटे झालेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली. संशयिताविरुद्ध कलम ३२८, ४२०, ६५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाने केली कारवाई
ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस नाईक किरण धनगर, हवालदार दीपक पाटील, पोलिस नाईक प्रमोद लाडवंजारी, रवींद्र पाटील, नंदलाल पाटील यांनी ही कारवाई केली.
हे देखील वाचा :
- जळगावात मांजा विक्रीसह वापर करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ८ जण ताब्यात
- Jalgaon : शेतीतून उत्पन्न नाही, कर्जफेडीची चिंता, घरात कोणी नसताना शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल
- जळगावात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन युवकांवर गुन्हा दाखल
- जळगावात चाकूचा धाक दाखवून वाइन शॉप चालकाला मागितली खंडणी; गुन्हा दाखल
- बसच्या धडकेत सैन्य दलातील जवान गंभीर जखमी; जळगाव शहरातील घटना