जळगावात शिवसेनेला मोठा धक्का : कट्टर शिवसैनिक शिंदे गटात

ऑगस्ट 8, 2022 7:53 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२२ । उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे शिवसेना वाचावी यासाठी मोठे प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात शिवसेना वाचविण्यासाठी संपूर्ण शिवसेना एकवटली आहे. मात्र आता जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार पडलं आहे. हा धक्का साधासुधा नसून शिवसेनाला या नेत्याच्या जाण्याने मोठे नुकसान होणार आहे असे म्हटले जात आहे.

पाचोरा तालुक्यातील कट्टर शिवसैनिक तसेच जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांच्यासह १०० समर्थक यांनी मंगळवारी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांच्या निवासस्थानी रावसाहेब पाटील यांच्यासह संपूर्ण जिल्हा परिषदेचा गट शिंदे गटात सहभागी झाला आहे.

shinde claim shivsena jpg webp

नुकतेच शिवसेना पक्षावर संकटं येत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यभरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यातच एकनाथ शिंदे भाजपसोबत महायुती करत सत्तेत आल्यानंतर शिंदे गटात जोरदार इन्कमिंग सुरु झाली आहे. नांदेडचे शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिलाय. शिवसेनेच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला आहे.

याच बरोबर संभाजीनगरमध्ये पक्षाविरोधी कारवाईचा ठपका ठेवत शिवसेनेनं आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याकडील महानगप्रमुख हे पद काढून घेतलं होतं. मात्र, पुन्हा एकदा शिंदे गटानं प्रदीप जैस्वाल यांची औरंगाबादच्या महानगप्रमुखपदी नियुक्ती केलीय.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now