⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात खुबा व गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोफत सुविधा उपलब्ध

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात खुबा व गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोफत सुविधा उपलब्ध

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२४ । डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत आता खुबा व गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अगदी मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे.याबाबतची माहिती रूग्णालय प्रशासनाने दिली. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात गरजू रूग्णांसाठी विविध शासकीय योजना उपलब्ध आहेत.

या योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मोफत उपचाराचा लाभ मिळवून दिला जातो. यात अस्थीरोग विभागात देखिल अनेक शस्त्रक्रिया मोफत केल्या जात होत्या परंतू खुबा व गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी रूग्णालयात सुविधा उपलब्ध नव्हती. संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार रूग्णालय प्रशासनाने योजना अधिका—यांना वारंवार विनंती केल्याने आता मात्र डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयाच्या अस्थीरोग विभागामार्फत खुबा व गुडघा प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रूग्णांवर महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार केले जाणार आहेत.

यामध्ये रूग्णालयात उपचारासाठी भरती होणार्‍या रूग्णांसाठी मोफत औषधोपचार आणि जेवणाचीही सुविधा उपलब्ध आहे. आवश्यक त्या तपासण्याही पॅकेजअंतर्गत केल्या जाणार आहेत.ओरीजनल रेशनकार्ड,कुटुंबप्रमुख व रूग्णांचे आधारकार्ड इ कागदपत्र सोबत आणणे गरजेचे आहे. तरी गरजू रूग्णांनी त्वरीत रूग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन अस्थीरोग विभागातर्फे करण्यात आले आहे.

अशी आहे तज्ञांची टीम
अस्थीरोग विभागाचे प्रमुख डॉ. दिपक अग्रवाल, डॉ. प्रमोद सारकेलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ डॉ. पियुष पवार, डॉ. प्रसाद, डॉ. चाणक्य, डॉ. शुभम अडकिणे, डॉ अंकित भालेराव, डॉ. गौतम कुंभार, डॉ. वेंदात पाटील, अशी तज्ञांची टीम उपचारासाठी उपलब्ध आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.