⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

अपघातात जखमी झालेल्या श्वानाच्या पिलाला मिळाले जीवदान ‎

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२२ । यावल‎ शहरात रविवारी एका अज्ञात वाहनाच्या‎ धडकेने श्वानाचे पिल्लू गंभीर‎ जखमी झाले. गावातील पशुप्रेमी‎ डॉ. विवेक अडकमोल यांनी या ‎पिलावर उपचार करत त्यास‎ जीवदान दिले. वाहन चालवताना ‎प्राण्यांना इजा होणार नाही, याची ‎ प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे‎ आवाहनही त्यांनी केले आहे.‎

भुसावळ रस्त्यावरील फालक‎ नगरा जवळ रविवारी सकाळी ११‎ वाजेच्या सुमारास एका अज्ञात‎ वाहनाच्या धडकेने श्वानाच्या‎ ‎लहानशा पिल्लास धडक दिली.‎ यात त्याच्या पायाला जबर दुखापत‎ झाली. रस्त्यावर ते पिल्लू‎ रक्तबंबाळ अवस्थेत विव्हळत‎ पडले होते. या भागातील धीरज‎ फेगडे यांनी लगेच गावातील डॉ.‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎विवेक अडकमोल यांना माहिती‎ दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न‎ करता उपचाराचे सर्व साहित्य घेवून‎ घटनास्थळी दाखल झाले. आणि‎ जखमी श्वानावर तातडीने उपचार‎ करून माणुसकीचे दर्शन घडवले.‎

पशुपक्षी, मुक्या प्राण्यांवर‎ मोफत उपचार‎

शहर व परिसरातील मोकाट गुरे,‎ श्वानासह विविध पक्षी जर कुठे‎ जखमी अवस्थेत कुणाला आढळले‎ तर त्वरित माझ्याशी संपर्क साधा,‎ असे त्यांनी उपस्थिताना सांगितले.‎ पशुप्रेमी डॉ.अडकमोल हे‎ निस्वार्थपणे जखमी पशुपक्षी, मुक्या‎ प्राण्यांवर उपचार करत असतात.‎