⁠ 
गुरूवार, जुलै 25, 2024

खान्देशातील प्रवाशांसाठी खुशखबर! येत्या महिन्याभरात धावणार पुणे एक्स्प्रेस भुसावळ-सुरत रेल्वेमार्गावर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२४ । खान्देशातील धरणगाव, अमळनेर, नंदुरबार भागातील प्रवाशांना थेट पुण्याला जाण्यासाठी रेल्वे गाडी नाहीय. त्यांना जळगाव भुसावळ गाठून पुणे जावे लागते. त्यामुळे या मार्गावरून पुण्याला जाण्यासाठी रेल्वे गाडी सुरु करण्याची मागणी केली जात आहे. अशातच पुणे एक्स्प्रेस सुरू करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून, येत्या एक महिन्यात गाडी भुसावळ-सुरत रेल्वेमार्गावर धावणार असल्याचे ठोस आश्वासन विभागीय रेल्वे अधिकारी वर्मा यांनी शिंदखेडा रेल्वेस्थानकाला दिलेल्या भेटीदरम्यान दिले.

भुसावळ येथून शिंदखेडा-नंदुरबार-भेस्तानमार्गे पुणे गाडी सुरू करण्याची मागणी प्रवाशांची होती‌. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या मार्गावर पुणे गाडी सुरू करण्याच्या सूचनादेखील रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या होत्या व या मार्गावर गाडी सुरू होईल, असे आश्वासन प्रवाशांना दिले होते. पुणे गाडी सुरू करण्यासंदर्भात तालुकाध्यक्ष मराठे यांनी श्री. वर्मा यांना स्मरण करून दिले. त्या वेळी वर्मा यांनी महिन्याच्या आत या मार्गावरून ही गाडी धावेल, असे आश्वासन दिले.

भुसावळ-सुरत रेल्वेमार्गावर धावणारी अमरावती एक्स्प्रेस नियमित करावी, भुसावळ-नंदुरबार ही गाडी सुरतपर्यंत पुन्हा पूर्ववत करावी, भुसावळ-नंदुरबार गाडी सुरतपर्यंत पुन्हा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. येत्या काही दिवसांत सुरू करण्याचे आश्वासन श्री. वर्मा यांनी दिले. या वेळी पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस, प्रेरणा एक्स्प्रेस, भागलपूर-सुरत एक्स्प्रेस, बरोली-अहमदाबाद एक्स्प्रेस, अहमदाबाद साप्ताहिक एक्स्प्रेस, इन्सार एक्स्प्रेस.

बांद्रा-पटणा एक्स्प्रेस, उधना बनारस एक्स्प्रेस या गाड्यांना शिंदखेडा रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात यावा याबाबतचे निवेदन रेल्वे प्रवासी संघटनेचे तालुकाध्यक्ष मराठे, रोशन टाटिया, राहुल मराठे यांनी दिले.