जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याचा प्रकार बुधवारी रात्री शिरसोली प्रार्थनास्थळात घडला. या प्रकरणी ‘त्या’ व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली.
अल्पवयीन मुलीने नातेवाइकांना ‘त्या’ व्यक्तीची माहिती दिल्यानंतर नातेवाईक संतप्त झाले. त्यानंतर रात्री येथे त्या व्यक्तीला नातेवाइकांसह नागरिकांनी पकडून चोप दिला. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. वेळीच पोलीसपाटील शरद पाटील यांनी मोठ्या जिकिरीने त्या व्यक्तीला जमावातून कसेबसे वाचवून औद्योगिक पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.
- भुसावळच्या व्यापाऱ्याला सायबर ठगांनी लावला ३४ लाखाचा चुन; अशी झाली फसवणूक?
- जळगाव जिल्ह्यातील ‘या’ शहरात आढळल्या शंबरच्या बनावट नोटा; दोघे पोलिसांच्या ताब्यात
- जळगावात अवैध गॅस भरणा केंद्रावर पोलिसांचा छापा; ३४ गॅस सिलेंडर जप्त
- जळगावात अपघाताचे सत्र थांबेना! ट्रॅक्टरच्या धडकेत जामनेरच्या महिलेचा मृत्यू
- धरणगाव तालुक्यात बसला पुन्हा भीषण अपघात ;एकाच मृत्यू, २१ जण जखमी