जळगाव जिल्ह्यातील ‘या’ शहरात आढळल्या शंबरच्या बनावट नोटा; दोघे पोलिसांच्या ताब्यात

डिसेंबर 15, 2024 2:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात पुन्हा बनावट नोटा सापडल्याने खळबळ उडाली आहे. सावदा शहरात १०० रुपये दराच्या ७६ बनावट नोटा आढळून आले. याबाबत पोलिसांनी २ संशयितांकडून बनावट नोटासह दुचाकी असे ३७ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. शेख आरिफ शेख फारूक, अझरखान अयुब खान (दोघे रा. ख्वाजा नगर, सावदा) या दोघांना पोलिसांनी अटक केली.

100 rs note

याबाबत असे की, सपोनि विशाल पाटील यांना सावदा शहरात बनावट नोटा बाळगणारे इसम येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यावरून वरिष्ठ अधिकारी महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, राजकुमार शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुक्ताईनगर भाग यांचे मार्गदर्शनाखाली विशाल पाटील यांनी त्यांचे पथकातील पोलीस उप निरिक्षक राहुल सानप, सफौ संजय देवरे, पोहेका संजीव चौधरी, पोहेका उमेश पाटील, पोहेका यशवंत तहाकडे, पोहेका किरण पाटील, पोना निलेश बाविस्कर यांचे पथकाने सापळा रचून शिताफीने सावदा शहरात बनावट नोटा बाळगणारे दोन संशयित व्यक्तींना अटक करण्यात आली.

सावदा शहरातील शेख आरिफ शेख फारूक, अझरखान अयुब खान (दोघे रा. ख्वाजा नगर, सावदा) यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यात भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या शंभर रुपये दराच्या ७६ चलणी नोटा व एक मोटरसायकल असा एकूण ३७ हजार ६००/- किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक अमोल गरजे हे तपास करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now