जळगावात अपघाताचे सत्र थांबेना! ट्रॅक्टरच्या धडकेत जामनेरच्या महिलेचा मृत्यू

डिसेंबर 14, 2024 1:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत असून अशातच ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील विटनेर गावाजवळ घडली. गीता भगवान पाटील (वय ४२, रा.माळपिंप्री ता. जामनेर) असे मयत महिलेचे नाव असून याबाबत ट्रॅक्टर चालकाविरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

gh 1

काय आहे घटना?
जामनेर तालुक्यातील माळपिंप्री गावात गीता पाटील या आपल्या कुटुंबासह राहत होत्या. त्या पुतण्या गणेश भास्कर पाटील (वय ४०) यांचेसह सकाळी दुचाकीने वावडदा येथे जात होत्या. तेव्हा विटनेर गावासमोरील शिव ढाबा समोर भरधाव ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात गीता पाटील ह्या रस्त्यावर पडल्या. क्षणात त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टर गेले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

त्यांना रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. प्रसंगी नातेवाईकांनी शोक व्यक्त केला. पुतण्या गणेश भास्कर पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर बळीराम दाढे (वय २५ रा. पळासखेडे मिराचे ता. जामनेर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now