
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरासह जिल्ह्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवू लागला आहे. एका बाजूला पावसाने पूर्णपणे ओढ दिली असून, दुसऱ्या बाजूला ‘ऑक्टोबर हिट’चा जोरदार तडाखा जळगावकरांना सहन करावा लागत आहे. गेल्या २४ तासांत जळगावच्या कमाल तापमानाचा पारा ३७ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. आगामी काही दिवस उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.
मागच्या काही दिवसापासून जळगावच्या तापमानाचा पारा ३५ अंशावर होता. मात्र आता ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच तापमाचा पारा वाढला आहे. काल गुरुवारी जळगावच्या किमान तापमानाचा पारा ३७.३ अंशावर पोहोचला. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असून, दुपारच्या सुमारास उकाड्यात आणखी वाढ होत आहे. त्यामुळे जळगावकर सध्या घामाच्या धारांनी हैराण झाले आहेत.
दिवसभर उन्हाचा चटका जाणवत असला तरी रात्रीच्या वेळीस काहीसा दिलासा मिळत आहे. गेल्या २४ तासात किमान तापमानाचा पारा १९.०६ अंशांपर्यंत नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे दिवसा उकाडा आणि रात्री तुलनेने गारवा, असे वातावरण जळगावमध्ये पाहायला मिळत आहे.
दरम्यान, पावसाने ओढ दिल्यानंतर आता तापमानात वाढ होत असल्याने ऑक्टोबर महिन्यातील पुढील दिवसांमध्ये हवामान कसे राहणार, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.





