अभिमानसास्पद : राज्यस्तरीय पीक स्पर्धेत जळगाव जिल्ह्याची आघाडी
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२३। राज्यांतर्गत पीक स्पर्धा खरीप हंगाम २०२२ मध्ये घेण्यात आली होती. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विविध पिकांमध्ये उत्पादकता वाढवून बाजी मारली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली.
राज्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येऊन उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबलमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
यामुळे कृषी उत्पादनांमध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्यातील एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश स्पर्धेचा होता. या पीक स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील खालीलप्रमाणे शेतकऱ्यांची राज्य व विभाग स्तरावर निवड झाली आहे.
खरीप ज्वारी : (सर्वसाधारण गट खरीप हंगाम २०२२) : राज्यस्तर द्वितीय क्रमांक- ज्ञानेश्वर पाटील (गहूखेडा, ता. रावेर), राज्यस्तर तृतीय क्रमांक-अर्जुन पाटील (वडगाव, ता. रावेर), विभागस्तर प्रथम क्रमांक- सुशील महाजन (खडका, ता. भुसावळ), विभागस्तर द्वितीय क्रमांक- ज्ञानदेव पाटील, (सुसरी, ता. भुसावळ), विभागस्तर तृतीय क्रमांक- श्रावण धनगर (काहूरखेडा, ता. भुसावळ). बाजरी : विभागस्तर तृतीय क्रमांक- सरदार गिरधर भिल (सांगवी, ता. चाळीसगाव).
मका : विभागस्तर प्रथम क्रमांक- मोहन पाटील (होळ, ता. रावेर), विभागस्तर तृतीय क्रमांक- किशोर गनवाणी (रावेर). तूर : विभागस्तर प्रथम क्रमांक- प्रांजली तायडे (चिंचखेडा बुद्रुक, ता. मुक्ताईनगर), विभागस्तर द्वितीय क्रमांक- तेजस अग्रवाल (बेलसवाडी, ता. मुक्ताईनगर), विभागस्तर तृतीय क्रमांक- विश्वनाथ पाटील (पिंप्रीनादू, ता. मुक्ताईनगर). मूग : विभागस्तर प्रथम क्रमांक- विजय पाटील (वाघोदे, ता. अमळनेर), विभागस्तर द्वितीय क्रमांक- प्रदीप पाटील (पिंगळवाडे, ता. अमळनेर), तृतीय क्रमांक- नहूष आबा पाटील (पिंगळवाडे, ता. अमळनेर).