जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२२ । भौतिक शास्त्र (पदार्थ विज्ञान) या विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या सेट परीक्षेत पारोळा येथील प्रियंका राजेंद्र बोरसे हिने घवघवीत यश संपादन केले आहे. प्रियंकाला डाॅ. मयूर चंद्रशेखर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल तिचे व तिच्या परिवाराचे आमदार चिमणराव पाटील, देवगाव विद्यालयाच्या प्राचार्या नलिनी पाटील, बाजार समितीचे सभापती अमोल पाटील, माध्यमिक पतपेढीचे संचालक नंदकुमार पाटील यांनी काैतुक केले आहे. प्रियंका ही गजानन माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक राजेंद्र बोरसे यांची कन्या आहे.

हे देखील वाचा :
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल
- जमीन कर्जासाठी आता ‘एनए’ची गरज नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना स्पष्ट आदेश
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!







