जळगाव शहर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन मोदी जळगावात

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२३ । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन मोदी यांनी शनिवारी जळगावात आल्या होत्या. यादरम्यान त्यांनी शहरातील ओंकारेश्‍वर मंदिरात पूजा-अर्चा केली.

जसोदाबेन मोदी या यात्रेनिमित्त जगन्नाथपुरी येथे जात आहेत.या दरम्यान, जळगावात त्या थांबल्या होत्या. सकाळी नऊच्या सुमारास त्यांनी ओंकारेश्‍वर मंदिरात पूजन केले. येथे सुमारे एक तास त्या होत्या. यानंतर त्या शेगाव येथे रवाना झाल्या.

दरम्यान, जसोदाबेन मोदी यांच्या सोबत त्यांची बंधू-भगिनी आणि सुरक्षारक्षक होते. ओंकारेश्‍वर मंदिरात त्या दाखल झाल्यानंतर मंदिर संस्थानच्या वतीने जुगलकिशोर आणि आशा जोशी यांनी त्यांचे स्वागत केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button