⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

भडगाव येथील दत्ता पवार पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रशांत पवार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । भडगाव येथील दत्ता पवार नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रशांत पवार यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. तर व्हाईस चेअरमनपदी साहेबराव पाटील यांची निवड करण्यात आली. पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. नवनिर्वाचित पंच कमेटीची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक सहकार अधिकारी भूषण बारी यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली.

या बैठकीस नवनिर्वाचित प्रशांत पवार, राजेंद्र सोनवणे, साहेबराव पाटील, अतुल पाटील, गणेश वाणी, रवींद्र सोनार, हाजी जाकीर कुरेशी, दीपक निकम, किरण पाटील, निर्मला महाजन, सीमा पाटील हे संचालक उपस्थित होते. प्रशांत पवार यांची बिनविरोध चेअरमन म्हणून फेरनिवड करण्यात आली. तर व्हाईस चेअरमन म्हणून साहेबराव पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच निवडणूक कामी सहकार्य केले म्हणून सहाय्यक सहकार अधिकारी बारी व संस्थेचे कॕॅशियर संजय पवार यांची नाभिक समाजाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित सर्व संचालक उपस्थित होते. निवड प्रक्रियेसाठी निबंधक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय प्रमुख डी.एस. पाटील, अविनाश पाटील, चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रेमसिंग पाटील, संस्थेचे मॅनेजर प्रमोद जडे, कॅशियर संजय पवार, लिपिक संजय येवले, देवेंद्र पवार, प्रमोद पाटील यांनी सहकार्य केले.