⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेरच्या सभेत प्रकाश आंबेडकरांचा एकनाथ खडसेंबाबत मोठा गौप्यस्फोट ; वाचा काय आहे

रावेरच्या सभेत प्रकाश आंबेडकरांचा एकनाथ खडसेंबाबत मोठा गौप्यस्फोट ; वाचा काय आहे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२४ । ऐन लोकसभा निवडणूक तोंडावर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी शरद पवारांची साथ सोडून भाजपात पुन्हा जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शरद पवार गटाला धक्का बसला आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ खडसेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. सुनेला तिकीट जाहीर झाल्यानंतर खडसे राष्ट्रवादीत थांबणारच नव्हते. एकनाथ खडसे यांना पक्षात घेऊ नका, असं मी शरद पवारांना सांगितलं होते. असा दावाच प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने संजय ब्राम्हणे यांना रिंगणात उतरविले असून त्यांच्या प्रचारार्थ आज प्रकाश आंबेडकर यांनी रावेरमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. हा हल्ला चढवतानाच त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावरही जोरदार टीका केली.

महाविकास आघाडीत रावेर लोकसभेची जागा एकनाथ खडसे यांच्यासाठी सोडण्यात आली होती. पण खडसे पक्ष सोडून जाणार होते. सुनेला जागा मिळाल्यानंतर सासरे थोडेच थांबणार होते. शरद पवार यांना माझं आवाहन आहे. तुमच्याकडे एखादी मशीन आहे का? मशीनमध्ये टाकल्यावर नेते साफ होतील अशी, अशी उपरोधिक टिप्पणी करतानाच एकनाथ खडसे यांना पक्षात घेऊ नका, असं मी शरद पवार यांना सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. एकनाथ खडसे यांना सर्व कळतं. खडसेंनी स्वत:च्या वापरासाठी बरोबर हुशारी केली. एकनाथ खडसे राष्ट्रवादीतून उठले आणि पुन्हा भाजपात गेले आणि हे नीतिमत्तेचे राजकारण करतात. खडसे यांनी आयाराम गयारामचं राजकारण केलं, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.