⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

तुम्हालाही दरमहा 9000 रुपये पेन्शन हवेय? मग सरकारच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक

नवी दिल्ली : आज आम्ही तुम्हाच्यासाठी गुंतवणुकीची एक उत्तम योजना सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला वृद्धकाळात पैशांसाठी कुणावर अवलंबून राहावं लागणार नाही. मोदी सरकारच्या या योजनेमध्ये कमी गुंतवणुकीवर वृद्धकाळात भरभक्कम पेन्शन मिळेल. त्या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री वय वंदना योजना (Pradhan Mantri Vaya Vandana Yojana). या अंतर्गत मासिक पेन्शनची हमी दिली जाते. ही योजना मोदी सरकारने 26 मे 2020 रोजी सुरू केली होती. या योजनेचा भाग होण्यासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत गुंतवणूक करता येईल. या योजनेत 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक मासिक किंवा वार्षिक पेन्शन योजना निवडू शकतात. संपूर्ण योजनेबद्दल जाणून घेऊया..

वय वंदना योजना काय आहे?
प्रधानमंत्री वय वंदना योजना ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. ज्या अंतर्गत लाभार्थीला मासिक पेन्शन मिळेल. ही योजना भारत सरकारने आणली आहे, तर ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चालवत आहे. ज्यांचे वय ६० ओलांडले आहे ते जास्तीत जास्त १५ लाख रुपये गुंतवू शकतात. यापूर्वी गुंतवणुकीची मर्यादा 7.5 लाख रुपये होती, ती आता दुप्पट करण्यात आली आहे. इतर योजनांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत अधिक रस मिळतो. आम्ही तुम्हाला सांगतो की 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक ही पेन्शन योजना निवडू शकतात.

अशा प्रकारे तुम्हाला 9250 रुपये मासिक पेन्शन मिळेल
तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला प्रधानमंत्री वय वंदना योजनेत 15 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या योजनेअंतर्गत तुम्हाला 7.40 टक्के वार्षिक व्याज देखील मिळेल. त्यानुसार, गुंतवणुकीवर वार्षिक व्याज 111000 रुपये असेल. जर ते 12 महिन्यांत विभागले गेले तर 9250 रुपयांची रक्कम तयार होते, जी तुम्हाला मासिक पेन्शन म्हणून मिळेल. या योजनेत तुम्हाला मासिक 1000 रुपये पेन्शन घ्यायची असेल तर तुम्हाला 1 लाख 50 हजार रुपये गुंतवावे लागतील.

10 वर्षांत पूर्ण रक्कम परत:
ही योजना 10 वर्षांसाठी आहे. तुमच्या जमा केलेल्या पैशावर मासिक पेन्शन मिळत राहील. तुम्ही 10 वर्षे या योजनेत राहिल्यास, 10 वर्षांनंतर तुमचे गुंतवलेले पैसे तुम्हाला परत केले जातील. तुम्ही ही योजना कधीही सरेंडर करू शकता.