जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । फैजपूर येथील डीएन कॉलेजमधील कै.दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधिनीचा विद्यार्थी पराग गजानन जावळे याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. याबद्दल प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांच्या हस्ते पराग जावळे याचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रबोधिनीचे समन्वयक तथा मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.एस.व्ही.जाधव, सदस्य डॉ.सागर धनगर, प्रा.शुभांगी पाटील उपस्थित होते.

कै.दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधिनीच्या माध्यमातून महाविद्यालय व परिसरातील इतर विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन व संदर्भग्रंथ उपलब्ध करून दिले जातात. त्याचा लाभ घेऊन आजपर्यंत दोन विद्यार्थी पीएसआय व दहा विद्यार्थ्यांची इतर क्षेत्रात कनिष्ठ अधिकारी म्हणून निवड झाली आहे. नुकतेच २०१९च्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात सुनोदा येथील पराग जावळे यांनी यश मिळवले. सोबतच जयेश भावसार याची मुंबई पोलिस दलात निवड झाली.












