POWERGRID मध्ये नोकरीची उत्तम संधी; 668 पदांसाठी भरती, भरघोस पगार मिळेल..

एप्रिल 18, 2026 5:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी सदंर्भ । नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (POWERGRID) ने विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये ज्युनियर ऑफिसर ट्रेनी, डिप्लोमा ट्रेनी आणि ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी यांसारख्या पदांचा समावेश आहे.

POWERGRID Recruitment

या भरतीद्वारे एकूण 668 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज 20 एप्रिल 2026 पासून सुरू होतील. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2026 (11:59 PM) निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार विहित पात्रतेनुसार अर्ज करू शकतात.

भरतीसाठी पात्रता काय?

डीटीई (इलेक्ट्रिकल): इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये ३ वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा, जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी किमान ७०% गुण आणि एससी/एसटी/पीडब्ल्यूडी प्रवर्गासाठी उत्तीर्ण गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

डीटीसी (सिव्हिल): सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा, जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी किमान ७०% गुण आणि एससी/एसटी/पीडब्ल्यूडी प्रवर्गासाठी उत्तीर्ण गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

डीटीएस (सर्वे): सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा सर्वे इंजिनिअरिंगमध्ये ३ वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा, किमान ७०% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

जेओटी (एचआर): बीबीए/बीबीएम/बीबीएस मध्ये 3 वर्षांची पूर्णवेळ पदवी, जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

जेओटी (एफ अँड ए): उमेदवार इंटरमिजिएट किंवा सीए किंवा सीएमए उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

जेटीटी (सर्वेक्षण): मान्यताप्राप्त संस्थेतून सर्वेक्षक ट्रेडमध्ये २ वर्षांचा पूर्णवेळ आयटीआय कोर्स केलेला असावा.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 11 मे 2026 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असावे. अर्ज करताना, उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. हे शुल्क ऑनलाइन गोळा केले जाईल आणि ते खालील अटींच्या अधीन आहे: जनरल, ओबीसी (एनसीएल), आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना डीटीई/जेओटी पदांसाठी ₹300 आणि जेटीटी पदांसाठी ₹200 भरावे लागतील. एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी आणि माजी सैनिक उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

किती पगार मिळेल?
सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना डीटीई आणि जेओटी पदांसाठी ₹250,000 चा बाँड सादर करणे आवश्यक असेल, तर जेटीटी पदांसाठी बाँडची रक्कम ₹125,000 आहे. एससी, एसटी आणि दिव्यांग (PwBD) उमेदवारांसाठी बाँडची रक्कम कमी आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now