‘वो तेरे प्यार का गम’… अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याचं पोस्टर प्रदर्शित
जळगाव लाईव्ह न्युज । १५ जुलै २०२२ । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी (Amruta Fadanvis) त्यांच्या वेगवेगळ्या गाण्यांनी महाराष्ट्राला वेड लावलंय असून अशात आता त्यांचं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘वो तेरे प्यार का गम’ या त्यांच्या नव्या गाण्याचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. लवकरचं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Amruta Fadanvis New Song
अमृता फडणवीस यावेळी ‘वो तेरे प्यार का गम हे’ हे ‘माय लव्ह’ या 1970मध्ये आलेल्या सिनेमातील गाणं रिक्रिएट करणार आहे. तेव्हा हे गाणं अभिनेते शशी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्यवर चित्रीत करण्यात आलं होतं.
अमृता फडणवीस यांनी याआधी हटके गाण्यांनी प्रेक्षाकांना वेड लावलं. त्यांच्या गाण्यांमुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला आहे मात्र अमृता फडणवीस नेहमीच त्याच जोशात नवं गाणं प्रेक्षकांसमोर घेऊन आल्या आहेत.
अमृता फडणवीसांच्या वो तेरे प्यार का गम हे या नव्या गाण्याचं पहिलं वहिलं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झालंय. अमृता फडणवीसांनी स्वत: पोस्टर शेअर करत ही माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे हिंदीमध्ये एक पोस्ट देखील त्यांनी शेअर केली आहे. त्यांनी म्हटलंय, ‘लेकर आ रही हूँ एक यादगार गीत पुराना… लफ़्ज़ नए है, पर रंग वही सुहाना …!’ त्याचप्रमाणे अमृता फडणवीसांनी सारेगम या म्युझिक कंपनीचे आभार देखील मानले आहेत.