⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

राजकीय उलथापालथ : महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांनी आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावले

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२२ ।राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वपक्षीय तयारी जोरात सुरु आहे. त्यात महाविकास आघाडीने सर्व आमदारांना मुंबईत बोलावले आहेत. सर्व आमदारांना सायंकाळी ७ किंवा ८ वाजेपर्यंत मुंबईत येण्यास सांगण्यात आले आहे.

राज्य सभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांशी चर्चा करणार आहेत, त्यानंतर सायंकाळी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. मंगळवार, ७ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या आमदारांशी चर्चा करणार आहेत. याशिवाय महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे अपक्ष उमेदवारही या बैठकीत सहभागी होणार आहेत. मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये हि बैठक होणार आहे.

काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या आमदारांना संध्याकाळी ७ वाजेपर्यंत हॉटेलमध्ये बोलवणार आहेत. सर्व आमदारांना सायंकाळी ७ किंवा ८ वाजेपर्यंत मुंबईत येण्यास सांगण्यात आले आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वी घोडेबाजार होऊ नये, यासाठी आमदारांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.

भाजपकडूनही अनेक हॉटेल्समध्ये बुकिंग करण्यात आले असून, कोणत्या हॉटेलमध्ये हे बुकिंग करण्यात आले आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करत असून, त्याआधारे ते हॉटेलमध्ये जाणार नाहीत. महाविकास आघाडी भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने आरोप केला आहे की तीन ते चार अपक्ष आमदारांना भाजपच्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून धमकावले जात आहे.