---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे भुसावळ

कार ट्रान्सफरमधील तिघांनी इतरही‎ गुन्हे केल्याचा पोलिसांना संशय‎

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२२ । ‎भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची कार परिवहनमंत्री अनिल परब ‎यांच्या नावावर ट्रान्सफर‎ केल्याप्रकरणी अटक केलेल्या तीन ‎संशयितांना पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले. दरम्यान, तिन्ही ‎संशयितांनी यापूर्वी परिवहन विभाग‎ व एनआयसीच्या साइटवरही‎ फेरफार केल्याचा संशय सायबर ‎पोलिसांनी व्यक्त केला आहे. ‎अटकेतील तीनही संशयितांना न्यायालायने दोन ‎दिवसांची पोलिस कोठडी‎ सुनावण्यात आली.‎

crime 18 jpg webp

अशोक विठ्ठल पाटील, अकिल ‎ ‎ शेख रहमान शेख, प्रशांत जगन्नाथ ‎ ‎ भाेळे या तिघांना पाेलिसांनी अटक‎ केली आहे.
अशोक पाटील यांचा‎ माेबाइल ओटीपीसाठी वापरला गेला‎ आहे. दरम्यान, आरटीओ एजंट पप्पू‎ भोळेने हा मोबाइल वापरल्याचा‎ दावा त्यांनी केला आहे. तर अकिल‎ नावाच्या एजंटने त्यांचा मोबाइल‎ नंबर अपडेट करून दिला‎ असल्याची तांत्रिक माहिती सायबर‎ ‎पोलिसांना मिळाली. या तीनही‎ संशयितांना गुरुवारी न्यायालयात‎ हजर करण्यात आले. यावेळी‎ पोलिसांनी न्यायालयास महत्त्वपूर्ण‎ माहिती सादर केली. त्यात‎ संशयितांनी एनआयसी (नॅशनल‎ इन्फॉरमेटिक्स सेंटर) या साइटवरही‎ फेरफार केल्याचा तसेच परिवहन‎ विभागाच्या पोर्टलवर यापूर्वीदेखील‎ अशा प्रकारे वाहनांचे बेकायदेशीर‎ ट्रान्सफर केल्याचा संशय आहे. हा‎ गुन्हा आमदार संजय सावकारे‎ यांच्याशी संबंधित असून, परिवहन‎ मंत्री अनिल परब यांच्या नावावर‎ कार ट्रान्सफर केली आहे. काळ्या‎ यादीतील वाहनांचे ट्रान्सफर करून‎ त्यांना नियमित केले असल्याची‎ शक्यता आहे.‎ ‎

---Advertisement---

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---