---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

ऐन निवडणुकीच्या तोंडावर खासदार उन्मेष पाटील अडचणीत ; आर्थिक फसवणुकीप्रकरणी उद्योगपतीची पोलिसात तक्रार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२४ । आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष भैय्यासाहेब पाटील अडचणीत सापडले आहे. यामागचे कारण म्हणजेच खासदार उन्मेष पाटील यांच्यासह निकटवर्तीयांनी कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करत उद्योगपती संजय मोहनराव सिनगारे (वय 50, रा.पाणीवेस, जालना) यांनी छत्रपती संभाजीनगरातील बेगमपुरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली.

unmesh patil jpg webp

दरम्यान याबाबत अद्याप गुन्ह्याची नोंद झालेली नसली तरी गुन्हा घडलेल्या पोलीस स्टेशन हद्दीत तक्रारी अर्ज वर्ग होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे नेते अमित शहा यांचा जळगाव दौऱ्याआधीच हे प्रकरण समोर आल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात असून राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

---Advertisement---

नेमकं प्रकरण काय?
प्रसिद्ध उद्योजक तथा फिर्यादी संजय सिनगारे यांनी दाखल केलेल्या या तक्रारीत अनेक गंभीर बाबींचा उहापोह करण्यात आला आहे. प्रामुख्याने त्यात नमूद आहे की, खासदार उन्मेष पाटील, त्यांचे मेव्हणे प्रशांत वाघ, सीए जाधव व त्यांचे मावसभाऊ रामेश्वर भानुसे यांनी सिनगारे बंधुंनी बोली लावून विकत घेतलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील श्रीनिवासा प्रोटीन प्रा.लि. (पूर्वीची रसोया प्रोटीन प्रा. लि.) या कंपनीत गोड बोलून व विविध आश्वासने देऊन संचालक म्हणून प्रवेश मिळवला तसेच कंपनीच्या खात्यातून बळजबरीने हात उसनवारीच्या नावाखाली वेळोवेळी 3.50 कोटी रूपये हे सीए जाधव यांच्या वडिलांच्या नरहरी जाधव यांच्या खात्यात वर्ग करून घेतले. तसेच, या कंपनीचे कर्ज मंजूर होण्यापूर्वी व युनीट चालू करण्याकरिता लागलेला खर्च 10.50 कोटी रूपये हा आम्ही नंतर तुम्हाला देऊ, असे सांगितले. परंतु पैसे मागितले असता देणार नाही, असे सांगून काय करायचे ते करा, असे धमकावल्याचा आरोप आहे. शिवाय ईडी, सीबीआय मागे लावायची धमकी देऊन पैसे देण्यास टाळाटाळ चालवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

एवढेच नाही तर वेळोवेळी तीन कोटी रुपयांची रक्कम खासदार साहेबांना लागते आहे, असे सांगून कंपनीतून काढून घेतली. या पैशाचीही मागणी केली असता, सिनगारे बंधुंसह संचालकांना धमक्या देऊन दमदाटी केली व पैसे दिले नाहीत. तसेच, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकार्‍यांना ा हाताशी धरून कंपनीच्या संचालक पदाच्या कोऱ्या राजीनामापत्रावर सह्या देण्यास धमकावले, कंपनीतील शेअर्स रक्कम 20 कोटी रुपये मला रोख स्वरूपात द्या, मी ती तुम्हाला फिवरून देतो, म्हणजे तुमचा व कंपनीचा काही संबंध राहणार नाही, असे बजावले. तसेच, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील शासकीय विश्रामगृहावर शिविगाळ, दमदाटी करून धमक्या दिल्यात, अशा आशयाची फिर्याद संजय मोहनराव सिनगारे यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. 2 मार्च रोजी पोलिसांनी तक्रारी अर्ज स्वीकारला असून प्रकरण चौकशीवर असल्याचे कळते. दरम्यान, या सर्व आरोपांवर खासदार उन्मेष पाटील नेमकं काय उत्तर देतात?, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

बेगमपुरा पोलिसात देण्यात आलेली तक्रार जशीच्या तशी !

image
ऐन निवडणुकीच्या तोंडावर खासदार उन्मेष पाटील अडचणीत ; आर्थिक फसवणुकीप्रकरणी उद्योगपतीची पोलिसात तक्रार 1
image 1
ऐन निवडणुकीच्या तोंडावर खासदार उन्मेष पाटील अडचणीत ; आर्थिक फसवणुकीप्रकरणी उद्योगपतीची पोलिसात तक्रार 2
image 2
ऐन निवडणुकीच्या तोंडावर खासदार उन्मेष पाटील अडचणीत ; आर्थिक फसवणुकीप्रकरणी उद्योगपतीची पोलिसात तक्रार 3
image 3
ऐन निवडणुकीच्या तोंडावर खासदार उन्मेष पाटील अडचणीत ; आर्थिक फसवणुकीप्रकरणी उद्योगपतीची पोलिसात तक्रार 4
image 4
ऐन निवडणुकीच्या तोंडावर खासदार उन्मेष पाटील अडचणीत ; आर्थिक फसवणुकीप्रकरणी उद्योगपतीची पोलिसात तक्रार 5
image 5
ऐन निवडणुकीच्या तोंडावर खासदार उन्मेष पाटील अडचणीत ; आर्थिक फसवणुकीप्रकरणी उद्योगपतीची पोलिसात तक्रार 6

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---