जळगावात एम.जे.कॉलेज परिसरातील कॅफेंवर पोलिसांच्या धडक कारवाईने खळबळ

मे 9, 2026 5:46 PM

​जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील मुख्य आणि विद्यार्थ्यांची सर्वाधिक वर्दळ असलेल्या एम. जे. (M.J.) कॉलेज परिसरातील काही कॅफेवर आज पोलिसांनी अचानक छापा टाकत मोठी धडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, इतर कॅफे चालकांचेही धाबे दणाणले आहेत.

cakeraid

​मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. एम. जे. कॉलेज परिसरात असलेल्या काही कॅफेमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या आणि गैरप्रकार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी एका विशेष पथकाची स्थापना केली होती.

​या विशेष पथकामध्ये पोलीस कर्मचारी अवेश शेख, प्रणय पवार आणि अमोल ठाकूर,रवींद्र जाधव यांचा समावेश होता. या धडक मोहिमेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, या पथकासोबत महिला आणि मुलींच्या छेडछाडीला आळा घालणारे आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत असलेले ‘दामिनी पथक’ देखील कारवाईत सहभागी होते. दामिनी पथकाच्या उपस्थितीमुळे या कॅफेंमध्ये चालणाऱ्या गैरप्रकारांवर आणि विशेषतः ‘कपल बॉक्स’ सारख्या प्रकारांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

​महाविद्यालयीन परिसरात अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी येत असतात. त्यामुळे परिसरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून ही विशेष मोहीम राबवण्यात आली. छापा टाकलेल्या कॅफेंची पोलिसांकडून कसून झडती घेण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now