⁠ 
शुक्रवार, जानेवारी 3, 2025
Home | बातम्या | सरकारची बेरोजगार तरुणांसाठी योजना; दर महिन्याला मिळणार ५००० रुपये, जाणून घ्या योजनेबाबत..

सरकारची बेरोजगार तरुणांसाठी योजना; दर महिन्याला मिळणार ५००० रुपये, जाणून घ्या योजनेबाबत..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । केंद्र सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जात आहे. यात बेरोजगार तरुणांसाठी देखील योजना राबविली जात असून या योजनांअंतर्गत दर महिन्याला ५००० रुपये मिळणार आहे. ही योजना नेमकी काय आहेत? हे जाणून घेऊया..

केंद्र सरकारने बेरोजगार तरुणांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरु केलीय. या योजनेअंतर्गत शिक्षण करताना तुम्हाला इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. या योजनेअंतर्गत ३ ऑक्टोबरपासून रजिस्ट्रेशन सुर झाले आहे. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना ५ वर्षांसाठी राबवण्यात आली आहे. ५०० कंपनींमध्ये १ कोटी तरुणांना इंटर्नशिप मिळणार आहे. यासाठी सरकारने अनेक कंपन्यांसोबत पार्टनरशिप केली आहे. जवळपास २४ सेक्टरमध्ये ८० हजारपेक्षा जास्त इंटर्नशिपची संधी उपलब्ध होणार आहे.

२१ ते २४ वयोगटातील तरुणांना इंटर्नशिप मिळणार आहे. पीएम इंटर्नशिप योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी भारताचा रहिवासी असावा.त्याचसोबत तो कोणत्याही ठिकाणी नोकरी करत नसावा. ग्रॅज्युएशन किंवा १२ वी पास झालेले तरुण शिक्षणासोबत इंटर्नशिप करु शकतात.ऑनलाइन कोर्स करणारे तरुणदेखील या योजनेत अर्ज करु शकतात.या योजनेअंतर्गत तरुणांना सरकारकडून ४५०० रुपये स्टायपेंड मिळणार आहे. तसेच ६००० रुपयांचे अनुदानदेखील दिले जाणार आहे.या योजनेअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी अभ्यासासोबत रोजगाराचीदेखील संधी निर्माण होणार आहे. ()

या योजनेअंतर्गत १९३ कंपन्यांमध्ये १२ ऑक्टोबरपासून नोंदणी सुरु झाली आहे.ज्युबिलंट फूडवर्क्स, मारुती सुझुकी इंडिया, आयशर मोटर्स, लार्सन अँड टुर्बो, मुथूट फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला भविष्यात नोकरी मिळण्यासाठी खूप फायदा होणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.