जळगाव लाईव्ह न्यूज : गणपती बाप्पाला शनिवारी निरोप देण्यात येणार आहे. विसर्जनासाठी जळगाव महापालिकेतर्फे जोरदार तयार करण्यात आली आहे. महापालिकेतर्फे विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, लाइट व्यवस्थाही करण्यात आली आहे. शनिवार, दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता महापालिकेत मानाच्या गणपतीची आरती झाल्यानंतर कोर्ट चौकापासून मिरवणुकीला सुरुवात होईल.

मेहरुण तलावावर गणेश घाट व सेंट टेरेसाशाळेकडील काठ अशा दोन ठिकाणी गणेश विसर्जन केले जाणार आहे. यासाठी ७ तराफे, ६ क्रेन व १ बोट व धोका लक्षात घेता पट्टीचे पोहणारे तरुणही सज्ज ठेवले जाणार आहेत

लाठी शाळा, पांझरापोळ शाळा, पिंप्राळा लिमडी शाळा, निमखेडी गट नं. १०१ पाण्याची टाकी, नाभिक समाज सभागृह, शिवाजी नगर या ठिकाणी मूर्ती संकलन करण्यात येणार आहे. त्यासाठी मनपाच्या ४५ कामगारांची नियुक्ती केलेली आहे.
विसर्जन मिरवणुकीत निर्माल्य संकलनासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबतच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्री सदस्य, गणेश मंडळांचे स्वयंसेवक व गणेश भक्त सक्रिय राहणार आहेत.
अशी असेल मेहरुण तलावावर तयारी
गणेश घाट
१ बोट
४५ कर्मचारी
५ तराफे
सेंट टेरसा शाळा
५ तराफे (२ राखीव)
४ क्रेन (२ राखीव)
१०० जीवरक्षक
पट्टीचे पोहणारे : १५ तरुण











