---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

मला मंत्री करू नका पण भाजपा सोबत युती करा – एकनाथ शिंदे

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२२ । एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्या मधील फोनवर चर्चा झाल्याची बातमी समोर येत आहे. यावेळी शिंदे यांच्याशी चर्चा करताना शिंदे यांनी आपल्या ठाकरे यांना सांगितले असल्याचे समजत आहे. मिलिंद नार्वेकर यांच्या फोनवर ही चर्चा झाली. यावेळी मला मंत्रिपद नको आहे. पण भाजपा सोबत युती करा अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यावेळी आता शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणे उत्सूकतेचे असणार आहे.

eknath shinde 1 jpg webp

वर्षभरापासून नगरविकासमंत्री एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर नाराज आहेत. त्यांच्या गटातील अनेक आमदार देखील महाविकासआघाडीवर नाराज आहेत.राज्यसभेनंतर कालच विधान परिषदेत देखील भाजपने महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. आपल्या अपयशाची कारणे शोधण्यासाठी शिवसेनेने आज बैठकीचे आयोजन केले होते. दरम्यान, काल सायंकाळपासून नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे त्यांच्या गटातील आमदार नॉटरिचेबल असल्याचे म्हटले जात आहे. याची खबर मातोश्रीवर पोहोचताच उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आमदारांच्या विशेष बैठकीचे आयोजन केले होते मात्र या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदेसह आमदार नॉटरिचेबल असल्यामुळे त्या ठिकाणी आली नाहीत यामुळे आता ते कोणचा टोकाचं पाऊल उचलतात का? हे पाहणे उत्सुकतेच ठरणार होत. पण मला मंत्री करू नका पण भाजपा सोबत युती करा अशी मागणी त्यांनी केली आहे.

---Advertisement---

एकनाथ शिंदे यांच्यासोबत अद्याप किती आमदार आणि मंत्री आहेत हे स्पष्ट होऊ शकले नाही. एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेच्या बैठकीत कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिंदे यांना गटनेते पदावरून हटविण्याचा निर्णय झाल्यावर शिंदे यांनी हे ट्विट केले. त्यानंतर शिंदे यांची भेट नारवेकर यांनी घेतली यावेळी त्यांनी फोन वरून शिंदेंशी चर्चा केली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---