⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

Petrol Diesel Rate : आजचा पेट्रोल-डिझेलचा दर जाहीर, ५ मे २०२२

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२२ । आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) आता पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किंमती भडकू लागल्या आहे. तरी सुद्धा देशांतर्गत बाजारात तेल कंपन्यांनी दिवशी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Rate)दरात कोणताही बदल केलेला नाही. आज सलग २९ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली नसल्यानं हा एक दिलासा मानला जातो आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमती प्रचंड वाढलेल्या होत्या. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज दरवाढ नोंदवली जात होती. मात्र आता कच्च्या तेलाच्या किंमती वाढलेल्या नसल्यामुळे इंधनाचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळतंय

नव्या दरानुसार आज जळगावमध्ये (Jalgaon) एका लिटर पेट्रोलचा दर 121.69 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर 104.34 रुपये इतका आहे.दरम्यान, कच्चे तेल महागले असून ब्रेंट क्रूड आता प्रति बॅरल $ 111.70 च्या आसपास आहे. देशात 6 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. यामुळे इंधन दरवाढीने होरपळून निघालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळत आहे.मात्र, 22 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 10 रुपयांची वाढ झाली होती.

इतर मोठ्या शहरातील दर
मुंबईमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे 120.51 आणि 104.77 रुपये एवढा आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 96.67 रुपये एवढा आहे. पुण्यात पेट्रोलचा भाव प्रति लिटर 120.30 रुपये असून, डिझेल 104. 30 रुपयांवर पोहोचले आहे. नागपूरमध्ये पेट्रोलचे भाव प्रति लिटर 120.15 तर डिझेल 102.89 रुपये लिटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल 120.15 तर डिझेल 104.40 रुपये लिटर आहे.

गेल्या मार्च महिन्यामध्ये जळगावमध्ये पेट्रोलचा दर 111.29 रुपये प्रति लिटर इतका होता, त्यानंतर 22 मार्चपासून पेट्रोल दर सलग वाढत गेले. 1 एप्रिलला पेट्रोल 117.93 रुपये प्रति लिटरवर पोहोचले होते. तर 6 एप्रिलपर्यंत वाढत ते 121.69 पोहोचले. तेव्हापासून पेट्रोल दर स्थिर आहे. एका महिन्यात पेट्रोल जवळपास 10 रुपयाने महागले आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज अपडेट केली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात.