जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२२ । रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मागील आठवडाभरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे भारतासाठी इंधन आयात महागली आहे. मात्र तूर्त निवडणूक प्रक्रिया सुरु असल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर स्थिर आहे. आज शनिवारी २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झाला नाही.आज जळगावमध्ये (Jalgaon) एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे.
देशात गेल्या ११४ दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. येत्या काळात देशात स्थिर असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठी वाढ होऊ शकते, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.
देशात चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय?
दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर
चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर
हे देखील वाचा :
- स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? Flipkart सेलमध्ये मिळतोय बंपर डिस्काउंट, बँक कार्डांवरही मिळेल सूट
- सावधान! तुम्हीही एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाते उघडलेय, मग ही बातमी नक्कीच वाचा
- Gold Silver Price : सलग दुसऱ्या दिवशी सोने महागले, मात्र चांदीमध्ये घसरण सुरूच
- Petrol Diesel Rate : आजचा पेट्रोल-डिझेलचा दर जारी, जाणून घ्या प्रति लिटरचा दर
- Bank Holiday : जूनमध्ये बँकांना तब्बल 12 दिवस सुट्ट्या ; बँकेत जाण्यापूर्वी जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज