पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग? आज किंमतीत काय बदल झाला?

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२३ । पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत गेल्या अनेक महिन्यापासून स्थिर आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज कोणताही बदल झालेला नाही. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 87.63 डॉलरवर विकले जात आहे. दरम्यान, देशात सरकारी तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्यानुसार आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price Today) कंपन्यांनी कोणताही बदल केला नाही. प्रत्येक राज्यात आणि शहरात इंधनाच्या दरात तफावत आढळते.

राज्यातील बड्या शहरातील दर

मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये तर डिझेलचा भाव 92.76 रुपये प्रति लिटर आहे. अहमदनगर पेट्रोल 106.85 रुपये, अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये, अमरावतीत 107.14, औरंगाबाद 107.02, नागपूरमध्ये 106.03, नांदेडमध्ये 108.50, जळगावमध्ये 107.42, नाशिकमध्ये 106.51 रुपये, लातूरमध्ये 107.38, कोल्हापूरमध्ये 107.45, पुण्यात पेट्रोलचा भाव 106.85, सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.67 रुपये प्रति लिटर आहे.

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.