जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२२ । आंतररारष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या दरात (Crude Oil Price)तेजी दिसून येत आहे. आज कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 125 डॉलरवर पोहोचले आहेत. कच्च्या तेलाच्या भावात तेजी असतानाही भारतात पेट्रोल, डिझेलचे (Petrol Diesel Rate) दर स्थिर ठेवण्यात आले आहेत.

भारतीय तेल कंपन्यांनी दररोजप्रमाणेच आज १० जून रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर अपडेट केले आहेत. आज देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. आज जाहीर झालेल्या नवीन दरानुसार जळगावात पेट्रोल ११२. १९ रु. प्रति लिटर तर डिझेल ९७.३४ रु.प्रति लिटर पर्यंत विकले जात आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. पेट्रोलवर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये अबकारी कर कमी करून सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशन संतप्त झाले आहे.
राज्याच्या प्रमुख शहरातील दर
मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.92 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.25 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 95.73 रुपये इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 112.97 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 98.89 रुपये एवढा आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.54 इतका आहे. ठाण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.78 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 95.25 रुपये इतका आहे.










