आजचा पेट्रोल डिझेलचा दर जाहीर ; ३ सप्टेंबर २०२१

सप्टेंबर 3, 2021 10:51 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२१ । पेट्रोलियम कंपन्यांनी आज शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थे ठेवले आहे. आज देशातील प्रमुख शहरांमध्ये इंधनाच्या दरात  Rate) कोणताही बदल झालेला नाही. कालदेखील देशभरात इंधनाचे दर स्थिर होते.

petrol diesel

सध्या आज जळगावात एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.६७ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९६.१० रुपये इतका आहे. तर मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलसाठी 107.39 रुपये आणि डिझेलसाठी 96.33 रुपये मोजावे लागत आहेत. दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.34 आणि 88.77 इतका आहे.

मध्यंतरी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत होत्या. इंधनाच्या दरांनी सार्वकालिक उच्चांक काढला होता. मात्र, जुलै महिन्यात या दरवाढीला ब्रेक लागला होता. त्यानंतर संपूर्ण जुलै महिना पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. तर ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात इंधनाचे दर किंचित का होईना कमी झाले होते. चार दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत तब्बल 60 पैशांची कपात झाली होती. गेल्या आठवडाभरापासून इंधनाचे दर स्थिर आहेत.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now