⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

दिलासा ! राज्यात पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त, वाचा तुमच्या शहरातील ताजे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२२ । केंद्रापाठोपाठ राज्य सरकारनेही पेट्रोल डिझेलवरील कर (VAT) कमी केला. त्यामुळे आज सोमवारपासून राज्यात पेट्रोल २ रुपये ८ पैशांनी तर डिझेल १ रुपया ४४ पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यानंतर आज जळगावात पेट्रोलचा प्रति लिटरचा दर ११० रु.५३ पैशांवर आला आहे. तर डिझलचा दर ९५.५९ रुपयावर आला आहे. त्यामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे.

दोन दिवसापूर्वी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने होरपळून निघणाऱ्या जनतेला केंद्र सरकारने दिलासा देत पेट्रोल आणि डिझेलवरील (Petrol Diesel) अबकारी कर (Tax) कमी केला. त्यामुळे पेट्रोल 9.50 रुपयाने तर डिझेलचे दर 7 रुपयांनी स्वस्त झाले. त्यानंतर काल रविवारी राज्य सरकारने देखील पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित कर (VAT) कमी केला.

त्यानुसार आज पेट्रोल, डिझेलचे दर स्वस्त झाले आहे. नव्या दरानुसार आज जळगावात पेट्रोलचा प्रति लिटरचा दर ११० रु.५३ पैशांवर आला आहे. तर डिझलचा दर ९५.५९ रुपयावर आला आहे. तर राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 109.27 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.84 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 109.35 रुपये असून डिझेलचा दर प्रति लिटर 94.48 रुपये इतका आहे. पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 108.87 रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 94 रुपये इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.95 रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.51 रुपये इतका आहे.

प्रमुख महागनगरातील पेट्रोलचे भाव
पेट्रोलियम कंपन्यांकडून आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 109.27 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.84 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपये लिटर आहे.

दैनंदिन वापराच्या वस्तूंची किंमत १०% पर्यंत घटेल
कॅट या छोट्या दुकानदारांच्या संघटनेने म्हटले आहे की, इंधन दर उतरल्याने दैनंदिन वापरातील वस्तूंचे दर १०% पर्यंत कमी होऊ शकतात. देशात ८०% वाहतूक रस्तेमार्गे होते. त्यासाठी डिझेल महत्त्वाचे ठरते.