⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबाबत कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२१ । सरकारी तेल कंपन्यांनी (IOCL) आज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आजही दरात कोणतीही वाढ झालेली नाही. सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी सरकारने पेट्रोलवर प्रतिलिटर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सरकारच्या घोषणेपासून इंधनाचे दर जवळपास स्थिर आहेत. जळगावात पेट्रोल ११७ रुपयांवर १११ रुपयांवर आलं आहे. डिझेल देखील कमी झाले असून ९४ रुपये २ पैसे प्रति लिटर इतके आहे.

देशातील इतर मोठ्या शहरांमधील पेट्रोल डिझेलचे दर
दिल्ली पेट्रोल 103.97 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर आहे.
मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर आहे.
चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर आहे.
कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर आहे.
श्रीगंगानगर पेट्रोल 114.01 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये प्रति लिटर आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.