⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

पेट्रोल-डीझेल दराबाबत पेट्रोलियम कंपन्यांनी घेलता हा निर्णय, वाचा आजचा दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२२ । भारतीय तेल विपणन कंपन्यांकडून दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर अद्यतनित केले जातात. आज, 13 फेब्रुवारी रविवारीही राष्ट्रीय बाजारपेठेत वाहन इंधन पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यापासून इंधन दरात कोणताही बदल झालेला नाहीय, त्यामुळे आज आज जळगावमध्ये एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे.

नोव्हेंबर 2021 पासून राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतील, पण देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी तीन महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केलेला नाही. उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. अशा परिस्थितीत सध्यातरी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल होणार नाही, अशी अपेक्षा आहे.

देशातील इतर मोठ्या देशातील दर
इंडियन पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या मते, महानगरांमध्ये, पेट्रोल मुंबईमध्ये सर्वात महाग आहे 109.98 रुपये प्रति लिटर आणि दिल्लीमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 95.41 रुपये आहे, तर आजही देशातील सर्वात स्वस्त पेट्रोलची विक्री केली जाते. पोर्ट ब्लेअरमध्ये 82.96 रुपये प्रति लिटर दर आहे, तर डिझेल 77.13 रुपये प्रति लिटर आहे.

आज, रविवार, 13 फेब्रुवारी रोजी देशाची राजधानी दिल्लीतील इंडियन ऑइलच्या पंपावर पेट्रोलचा दर 95.41 रुपये प्रति लिटर इतका कायम आहे. त्याचवेळी डिझेलचा दरही 86.67 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. तेलावरील व्हॅट आणि मालवाहतुकीच्या दरामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती राज्यानुसार बदलतात.

हे देखील वाचा :