जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२५ । केंद्र सरकारने उत्पादन शुल्क वाढवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. पेट्रोल आणि डीझेलवरील एक्साईज ड्यूटीत 2 रुपये प्रति लिटर वाढ केली आहे.

जागतीक तेलाच्या किमतींमध्ये सुरू असलेल्या चढउतार आणि डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. हे नवे दर मध्यरात्री १२ वाजता लागू होणार आहेत.
जळगावमध्ये सध्या एक लिटर पेट्रोलचा दर 105.50 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर 92.03 रुपये प्रति लिटर इतका आहे. दरम्यान, आता वाढलेल्या एक्साईज ड्यूटीमुळे तेल कंपन्या या तेलाच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात लवकरच मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
मात्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज डयूटी वाढवले असले तरी, त्याचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही असा दावा सरकारने केला आहे. उत्पादन शुल्कात वाढ झाल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील तेल व्यापार कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती वाढवू नयेत असे सांगण्यात आले असल्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने म्हटले आहे .