सोमवार, डिसेंबर 11, 2023

Jalgaon : माथेफिरुन रेल्वे मालगाडीवर चढला अन्.. मृत्यूचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२३ । जळगाव रेल्वे स्टेशनवर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माथेफिरुन थांबलेल्या रेल्वे मालगाडीवर चढत असताना त्याला विद्यूत शॉक लागला आहे. यात इसम जागीच ठार झाला असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हा प्रकार प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर घडला आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

व्हिडीओमध्ये मालवाहू रेल्वेच्या डब्यावर हा व्यक्ती चढत असल्याचं दिसत आहे. डब्यावर उभा राहिल्याने एका अनोळखी व्यक्तीचा रेल्वेच्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन केले असून नजीकच्या जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. या घटनेबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.