उद्या पासून गजानन किर्तीकरांना लोक विसरतील – खा. संजय राऊत
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२२ । गजानन कीर्तिकर आमचे ज्येष्ठ सहकारी होते. आता त्यांनी पक्ष सोडला आहे. ते पाचवेळा आमदार, दोनवेळा खासदार राहिले. किर्तीकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात तेव्हा लोकांच्या मनात एक वेगळी भावना निष्ठा यासाठी होते. ते गेल्यामुळे फार काही नुकसान झालेले नाही. उद्यापासून त्यांना लोक विसरतील. याच बरोबर त्यांचे पुत्र मात्र आमच्यासोबत राहिले आहेत. असंही संजय राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पस्थितीत शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी शिदें गटात प्रवेश केला. अगोदरच शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात गेले आहेत. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांना लोक विसरतील असे राऊत म्हणाले
गजानन किर्तीकर मंत्रिपद सुद्धा दिले. त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर पक्षासोबत राहिले आहेत. ते कडवट शिवसैनिक आहेत. आमच्या पक्षाला कोणताही धक्का नाही. त्यांची दिशा बरोबर आहे की चुकीची हे जनता ठरवते. अंधेरीमध्ये काय झाले आपण पाहिले आहे. पोटनिवडणुकीत जनतेचा कौल सर्वांना कळाला आहे. किर्तीकर यांनी केलेल्या न्यायाच्या टीकेवर बोलताना संजय राऊत म्हणाले,