जळगाव जिल्हाजळगाव शहर

५१९ विद्यार्थ्यांनी दिली “शिवरायांच्या” जीवनावर आधारित परीक्षा, विजयते बघणार पावनखिंड चित्रपट!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२२ । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त युवाशक्ती फाउंडेशन आयोजित तसेच महावीर क्लासेसच्या सहकार्याने २० रोजी “पावनखिंड” हा चित्रपट आयनॉक्स मल्टिप्लेक्स येथे १११ विद्यार्थ्यांना ‘मोफत’ दाखविण्यात येणार आहे. यावेळी महापौर जयश्री महाजन, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, महावीर क्लासेसचे संचालक नंदलाल गादिया, युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक विराज कावडिया, सचिव अमित जगताप उपस्थित राहणार आहे.

यासाठी 14 ते 20 वर्ष वयोगटातील ५१९ विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित परीक्षा दिली. परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 20 प्रश्न विचारण्यात आले होते. ही परीक्षा एम.सी.क्यू. (Mutliple Choice Question) पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या १११ विद्यार्थ्यांना रविवारी पावनखिंड हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सविस्तर इतिहासाची विद्यार्थ्यांना माहिती मिळावी तसेच आदर्श शिव जयंती साजरी व्हावी या हेतूने सदर आयोजन करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button