⁠ 

उष्णतेपासून दिलासा नाहीच! जळगावात उष्णतेची लाट कायम राहणार ; IMD चा नेमका अंदाज काय? वाचा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२४ । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून उष्णतेची लाट कायम असून असह्य करणाऱ्या उष्णतेपासून जळगावकर अक्षरश: होरपळून निघत आहे. उष्णतेपासून कधी दिलासा मिळेल याची प्रतीक्षा लागली असताना मात्र हवामान खात्याने पुढील आठवडाभर जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा दिलासा.

त्यामुळे जळगावकरांना आठवडाभर उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात 144 कलम लागू केली असून या आदेशान्वये सकाळी 11.30 ते सायंकाळी 4.30 या कालावधीत नागरिकांनी बाहेर जाणे टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

जळगावात तापमानाने उच्चांकी ४५ अंशापेक्षा जास्त पर्यंत उसळी घेतली होती. यामुळे सकाळपासूनच असह्य करणारा उकाडा जाणवत आहे. दुपारनंतर तर रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. रात्रीपर्यंत उष्णतेच्या झळा जाणवत असून यामुळे जळगावकर चांगलाच हैराण झाला आहे. जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून अजूनही पुढील आठवडाभर जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात वाढत्या तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात 144 कलम लागू केली. यामुळे आता वाढत्या तापमानामुळे कामगारांना देखील काम करणे बंधनकारक करता येणार नसून कामगारांना योग्य अधिकार मिळावा यासाठी ही कलम लागू केल्याचे ही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे तर आवश्यक त्या परिस्थितीमध्ये कामाच्या ठिकाणी कामगारांसाठी योग्य पाण्याची सोय पंखे कुलर यासारख्या उपाययोजना करणे बंधनकारक असून कोचिंग क्लासेस मध्ये विद्यार्थ्यांसाठी योग्य ती काळजी घेण्याचे या आदेशाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केले आहे.