Gold Price : जळगावच्या सुवर्णबाजारात घसरणीनंतर सोन्याच्या भावात पुन्हा वाढ

जानेवारी 16, 2025 10:41 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२५ । मागील काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मकर संक्रातीनंतर सोने दरात घसरण दिसून आली. मात्र यानंतर पुन्हा एकदा भावात वाढ झाली. बुधवारी सोन्याच्या दरात ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे चांदीचा दर स्थिर दिसून आला.

gold 7 jpg webp

बुधवारी जळगावच्या सराफा बाजारात शुद्ध सोन्याचे दर ७८८०० रुपये प्रति तोळा (जीएसटीसह ८११६४) तर चांदी ९१००० रुपये किलोवर स्थिरावली. सोमवारी चांदी ९२००० रुपये किलो तसेच मंगळवारी शुद्ध सोने ७८५०० रुपये प्रति तोळा होते.

अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प २० जानेवारीला विराजमान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलाढाल होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. २० जानेवारीला ट्रम्प इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणावर जाणवण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून बाजाराच्या अनिश्चिततेत सोन्याच्या खरेदीकडे ग्राहकांचा आणि गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. त्यामुळे सोन्याचे भाव पुन्हा वधारत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now