---Advertisement---
जळगाव जिल्हा

गोरगरिबांचा नेता, आपला गुलाबभाऊ म्हणत ई-सायकल स्वीकारल्यानंतर लाभार्थी बांधवांच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२४ । खरंच नेता असावा तर गुलाबराव पाटील यांच्या सारखा.. ज्यांना शेतकरी, विद्यार्थी, दिव्यांग, वारकरी, वयोवृद्ध, सर्वांची काळजी आहे. जनता त्यांना उगाचच ‘आपला गुलाबभाऊ म्हणत नाही. गोरगरिबांचा नेता, आपला गुलाबभाऊ, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत इलेक्ट्रिक सायकल स्वीकारल्यानंतर लाभार्थी बांधवांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. हा गोड सोहळा जळगाव ग्रामीण मतदार संघातील भोकर गावात संपन्न झाला.

Distribution of electric bicycles jpeg webp

भोकर गावात दिव्यांग बांधवांना पहिल्या टप्प्यात ४ तर दुसऱ्या टप्प्यात ७ इलेक्ट्रिक सायकल वाटप करण्यात आल्यात. त्यात १) अनिल अशोक पवार २) रघुनाथ एकनाथ वाघ ३) ज्ञानेश्वर भगवान बाविस्कर ४) राकेश प्रभाकर सोनवणे ५) अनिल सुकदेव भोई ६) दिलीप नाना पाटील, ७) पवन अंबादास पाटील यांचा समावेश होता. विशेष म्हणजे गावातील उपस्थित असणाऱ्या सातही गरजू दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक सायकल वाटप ग्रामस्थांच्या हस्तेच घर बसल्या गावातच देण्यात आल्या. सायकल घेतल्यानंतर अनेक दिव्यांग बांधवांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. गोरगरिबांचा नेता, आपला गुलाबभाऊ म्हणत सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसत होता. आणि ते सर्व गुलाबभाऊंचे आभार व्यक्त करत होते.

---Advertisement---

यावेळी ग्रामस्थांनी सुद्धा गुलाबभाऊंचे आभार मानले. या प्रसंगी गावातील जेष्ठ नागरिक सुभाष आप्पा, रामकृष्ण धनगर, भागवत पांडू, युवराज वामन, सुभाष टेलर, डॉ. दिलीप लाठी, गोपाळ भाऊसाहेब, प्रविण पुंडलिक, किसन आण्णा, भागवत आप्पा, बालाशेठ, सरपंच भीमराव सोनवणे, माजी सरपंच अरुण भाऊ, रवींद्र सोनवणे, प्रमोद सोनवणे दिपक पाटील, उपसरपंच भोला भाऊ, सचिन लाठी, लीलाधर लालचंद, गणेश नामदेव, नामदेव भाऊ कठोरा आदी मान्यवर उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---