⁠ 
शनिवार, सप्टेंबर 21, 2024
Home | नोकरी संधी | नोकरीच्या शोधात असलेल्या 12वी पाससाठी सुवर्णसंधी..लगेचच करा अर्ज, पगार 81000

नोकरीच्या शोधात असलेल्या 12वी पाससाठी सुवर्णसंधी..लगेचच करा अर्ज, पगार 81000

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण पाटणा उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर आणि कॉम्प्युटर ऑपरेटर इत्यादींसह अनेक पदांच्या 159 जागांसाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार पाटणा उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मार्च आहे.

एकूण जागा : १५९

रिक्त जागा तपशील
या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 159 पदांसाठी भरती करण्यात येणार आहेत. ही पदे स्टेनोग्राफर आणि कॉम्प्युटर ऑपरेटर कम टायपिस्टची आहेत. स्टेनोग्राफर गट क ची 129 पदे आणि संगणक परिचालक सह टंकलेखक गट क ची 30 पदांसाठी भरती करण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता :

पाटणा उच्च न्यायालयाच्या या पदांसाठीच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलताना, स्टेनोग्राफर पदांसाठी 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात आणि पदवीधर उत्तीर्ण उमेदवार संगणक ऑपरेटर पदांसाठी अर्ज करू शकतात.

वयाची अट
यासाठी 18 ते 37 वर्षे वयोमर्यादा आहे.

परीक्षा फी :

UR/EWS/EBC/BC : 1000 रुपये
SC/ST/OH : 500 रुपये

पगार
तुमची पाटणा उच्च न्यायालयाच्या या पदांसाठी निवड झाल्यास उमेदवारांना 25,500 ते 81,100 रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल.

अर्ज कसा करायचा?
उमेदवारांना या पदांबद्दल तपशीलवार माहिती हवी असल्यास तुम्ही पाटणा उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. उमेदवारांची निवड लेखी चाचणी, इंग्रजी शॉर्टहँड-संगणक टायपिंग चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

हे पण वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.