⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 6, 2024
Home | नोकरी संधी | युनियन बँकेत तब्बल 1500 जागांवर भरती सुरु; पात्रता फक्त पदवी पास अन् पगार 85,920

युनियन बँकेत तब्बल 1500 जागांवर भरती सुरु; पात्रता फक्त पदवी पास अन् पगार 85,920

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी बँकेत तुमचंही नोकरी करण्याचं स्वप्न असेल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी चालून आलीय. युनियन बँक ऑफ इंडियाने तब्ब्ल 1500 जागांवर भरतीची अधिसूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध केलीय. विशेष या भरती प्रक्रिया सुरुवात झाली असून पदवी पास असलेल्या उमेदवारांना नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 नोव्हेंबर 2024 आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता त्वरित अर्ज करावा. Recruitment 2024 :

ही भरती स्थानिक बँक अधिकारी (LBO) या पदांसाठी होणार आहे. रिक्त 1500 जागांपैकी 613 पदे सामान्य श्रेणीसाठी, 404 पदे OBC प्रवर्गासाठी, 224 पदे SC प्रवर्गासाठी, 109 पदे ST प्रवर्गासाठी, 150 पदे EWS प्रवर्गासाठी आणि 60 पदे PwBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी आहेत.

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹850/- [SC/ST/PWD:₹175/-]
पगार : 48,480-2000/7-62,480-2340/2-67,160-26,80/7-85,920/-

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.