⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | नोकरी संधी | ITBP मध्ये 526 जागांसाठी मेगाभरती; 10वी, 12वी उत्तीर्णांना नोकरीची मोठी संधी..

ITBP मध्ये 526 जागांसाठी मेगाभरती; 10वी, 12वी उत्तीर्णांना नोकरीची मोठी संधी..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । तुमचीही देशसेवा करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. इंडो- तिबेटियन बॉर्डर पोलिस दलात मोठी पदभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून त्यानुसार अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना itbppolice.nic.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 आहे. या भरतीद्वारे एकूण 526 जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता अर्ज करावा.

ही पदे भरली जाणार?
1) सब इंस्पेक्टर (Telecommunication) 92
2) हेड कॉन्स्टेबल (Telecommunication) 383
3) कॉन्स्टेबल (Telecommunication) 51
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: B.Sc (Physics, Chemistry and Mathematics /IT/Computer Science/ Electronics and Communication / Electronics and Instrumentation) किंवा BCA किंवा B.E. (Electronics and Communication / Instrumentation / Computer Science/Electrical / IT)
पद क्र.2: 45% गुणांसह 12वी (Physics, Chemistry and Mathematics) उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण+ITI (Electronics/Electrical/Computer) किंवा 10वी उत्तीर्ण+ डिप्लोमा (Electronics/ Communication/ Instrumentation/Computer Science/IT/Electrical)
पद क्र.3: 10वी उत्तीर्ण

वयाची अट :
सब इंस्पेक्टर पदांसाठी उमेदवाराचे वय 20 ते 25 वर्षे दरम्यान असावे. त्याच वेळी, हेड कॉन्स्टेबल पदांसाठी वयोमर्यादा 18 वर्षे ते 25 वर्षे आणि कॉन्स्टेबल पदांसाठी 18 वर्षे ते 23 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तथापि, सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

इतका पगार मिळेल?
सब इंस्पेक्टरचे वेतन 35,400 ते 1,12,400 रुपये आहे. हेड कॉन्स्टेबल पदासाठी पगार 25,500 ते 81,100 रुपये, तर कॉन्स्टेबलच्या भूमिकेसाठी 21,700 ते 69,100 रुपये पगार असतो.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.