जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । चौथी पास ते दहावी पास तरुणांनी खूशखबर आहे. कोचिन शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर केलीय. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेला सुरुवात झालीय. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. तुम्ही cochinshipyard.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ नोव्हेंबर २०२४ आहे.
या भरतीमार्फत एकूण ७१ जागा भरल्या जात आहे. त्यात स्काफोल्डर पदासाठी ५० जागा रिक्त आहेत.कुशल मेकिनकच्या पदासाठी २१ जागा रिक्त आहेत. मेकॅनिक पदासाठी १० पास उमेदवार अर्ज करु शकतात. स्काफहोल्डर पदासाठी चौथी पास उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कामाचा अनुभव असायला हवा. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३० वर्ष असावी. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला cochinshipyard.in या वेबसाइटवर जायचे आहे. त्यानंतर करिअर या सेक्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर वन टाइम रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचे आहे. यानंतर तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे.
या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला २०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज फी जमा केल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.