⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | नोकरी संधी | सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन उमेदवारांसाठी जम्बो भरती; अर्ज कसा करावा?

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन उमेदवारांसाठी जम्बो भरती; अर्ज कसा करावा?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । बँकांमध्ये सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने स्पेशालिस्ट ऑफिसरच्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. एकूण २५३ रिक्त जागांवर ही भरती केली जाणार आहे. Central Bank of India Bharti

अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 18 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना बँकेच्या अधिकृत वेबसाइट, Centralbankofindia.co.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. लक्ष्यात असू अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 डिसेंबर 2024 पर्यंत आहेत.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित विषयात पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे. या नोकरीसाठी पदानुसार पात्रता बदलली जात आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २३ ते ४० वर्ष असणे गरजेचे आहे. ही वयोमर्यादादेखील पदानुसार बदलते. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना ८५० रुपये शुल्क भरायचे आहे.

अर्ज कसा करावा?
नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी centralbankofindia.co.in या वेबसाइटला भेट द्या.
त्यानंतर रिक्रूटमेंट वर क्लिक करा. त्यानंतर अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
यानंतर Click Here For New Registration वर क्लिक करा.
यानंतर तुम्ही इतर माहिती, फोटोग्राफ आणि सही अपलोड करा.
यानंतर तुम्ही शुल्क जमा करुन फॉर्म सबमिट करु शकतात.

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.