⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | नोकरी संधी | भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये 10वी, 12वी पाससाठी मोठी भरती; विनापरीक्षा होणार निवड

भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये 10वी, 12वी पाससाठी मोठी भरती; विनापरीक्षा होणार निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर असून भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये भरती सुरु आहे. एकूण १५० रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये फ्रेशर पदांसाठी भरती केली जाणार आहे. ज्या तरुणांचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे आणि नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

भारत डायानामिक्स कंपनी ही देशात अत्याधुनिक मिसाइल आणि सुरक्षा तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी काम करते. या कंपनीत अप्रेंटिसशिप ट्रेनिंग प्रोग्रामअंतर्गत भरती केली जाणार आहे.भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये फिटर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मशिनिस्ट, वेल्डर पदांसाठी भरती केली जाणार आहे. ITI उत्तीर्ण उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

भारत डायनामिक्स लिमिटेडमधील या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जपप्रक्रिया ११ नोव्हेंबर २०२४ पासून सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करायचा आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही मेरिट बेसिसवर केली जाणार आहे. आयआयटीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.या नोकरीसाठी तुम्ही bdl-india.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.